वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ निराधार जनतेला जीवनावश्यक वस्तूचा आधार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ एप्रिल २०२०

वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ निराधार जनतेला जीवनावश्यक वस्तूचा आधार
तंगडपल्लीवार परिवाराचा उपक्रम

निफन्द्रा (प्रतिनिधी)
कोरोणाचा कहर सध्या संपूर्ण भारतात सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने या संसर्गजन्य रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी लाकडावून, संचारबंदी, राज्य व जिल्हा बंदि केली. संचार बंदीमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे जनतेला जगावे की मरावे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा एक हात पुढे करून सावली तालुक्यातील कापसी येथील भोलेनाथ राईस मिलचे संचालक, माजी बांधकाम सभापती, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संतोष तंगडपल्लीवार व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, प्रभारी सरपंच सचिन तंगडपल्लीवार यांनी आपले वडील स्वर्गीय सुधाकर तंगडपल्लीवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कापसी येथील अपंग, वृद्ध,  विधवा,  निराधार अशा 140 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. यांच्या या कार्यामुळे तंगडपल्लीवार परिवाराचे तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे. सदर कुटुंब नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून अनेकांच्या अडचणींना धावून जात असल्याचे परिचित आहेत.