एक डोळा व नाक नसलेले विचित्र वासराचा जन्म - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ एप्रिल २०२०

एक डोळा व नाक नसलेले विचित्र वासराचा जन्मभद्रावती तालुक्यातील गुडगाव येथील प्रकार

भद्रावती (शिरीष उगे) तालुक्यातील गुडगाव येथील शेतकऱ्यांच्या घरी दिनांक अकराला कपाळावर एक डोळा व नाक नसलेले विचित्र वासराचा जन्म दिल्याची घटना घडली या विचित्र वासराचा जन्म झाल्याने येथील नागरिकांनी गावात एकच गर्दी केली आहे.
गुडगाव येथील शेतकरी बाळू जरूरकर यांच्याकडे पाच वर्षापासून पाळीव गाय आहे दिनांक अकराला गाईने वासराला जन्म दिला त्या वासराचा संपूर्ण आकार परिपूर्ण असला तरी कपाळावर एक डोळा असून त्याला नाक नाही ते वासरू तोंडा व्दारे श्वासोश्वास घेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले हे वासरू जन्मानंतर ठणठणीत असून जिवंत असल्याचे जरूरकर यांनी सांगितले.