वादळी पावसामुळे टॉवर जमीनदोस्त; शेतकाऱ्यांचे नुकसान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ एप्रिल २०२०

वादळी पावसामुळे टॉवर जमीनदोस्त; शेतकाऱ्यांचे नुकसान

भद्रावती/शिरीष उगे (दि.19)
काल मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार वादळासह विज व पाऊस पडला.
विजांचा कडकडाट, मेघगर्जना, व जोरदार पाऊसाने झोडपले त्यात शेतकरी, झोपडपट्टी परीसर व काही नागरीकांचे मोठे नुकसान झाले आहे.
भद्रावती येथील पॉवर ग्रीड परळी येथे जाणारे तीन टॉवर तालुक्यातील चिरादेवी येथे पडले. त्यात मधुकर आत्राम यांचे घराचे थोडे नुकसान झाले आहे.
     रात्री झालेल्या वादळी पाऊसामुळे चारगाव हेडवर्क्स येथील ईलेक्र्टिक लाईन तुटल्यामुळे आज दिनांक १९-०४-२०२० रोज रविवारला भद्रावती शहरातील संपुर्ण पाणीपुरवठा बंद राहिल याची सर्वांनी नोंद घ्यावी.