सावरटोला-बोरटोला येथे सॅनिटायझर फवारणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ एप्रिल २०२०

सावरटोला-बोरटोला येथे सॅनिटायझर फवारणी


जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांचा पुढाकार


संजीव बडोले/नवेगावबांध
नवेगावबांध:-Covid-19 या कोरोनाव्हायरस ने संपूर्ण जगाला हादरून सोडले लाखो लोकांचे बळी घेतले होना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार अनेक उपाययोजना अंमलात आणीत आहे. देश-विदेश, शहरापासून तर खेड्यापर्यंत या कोरोनाच्या भीतीने नागरिकांना हैराण केले आहे. आपल्या जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत गावात कोरोनाव्हायरस विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये व संसर्गापासून नागरिकांचे रक्षण व्हावे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोने यांनी आपल्या नवेगावबांध जिल्हा परिषद क्षेत्रातील सावरटोला बोरटोला या गावात दिं.14 एप्रिल रोज मंगळवारला सॅनिटायझर ची फवारणी केली. सावरटोला ,बोरटोला या गावातील ग्रामवासियांनी किशोर तरोणे यांचे अभिनंदन केले.सावरटोला,बोरटोला ग्रामवाशियानी सॅनिटायझर फवारणीला उत्तम सहकार्य केले. लोकांच्या सहकार्याबद्दल किशोर तरोणे यांनी नागरिकांचे आभार मानले.