शापोआ मदतनीस महिलांचे मानधन गेले कुणीकडे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ एप्रिल २०२०

शापोआ मदतनीस महिलांचे मानधन गेले कुणीकडे

खबरबात on Twitter: "गोंदिया-विविध विकास ...
नागपूर : अरूण कराळे :
नागपूर पंचायत समिती अंतर्गत वाडी नगर परिषद हद्दीतील सोळा शाळांमध्ये आहार वाटप करणाऱ्या मदतनीस महिलांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

वाडी समूह साधन केंद्रातील ३४ शाळांपैकी अकरा खाजगी व पाच जिल्हा परिषद शाळांना नगर परिषद स्तरावरून टेंडर मंजूर करण्यात आलेल्या एका संस्थेला शिजवलेले अन्न वाटपाचे कंत्राट देण्यात आले असून माहे डिसेंबर २०१९ पासून सदर कंत्राटदार आहार शाळेमध्ये पोहचून देत आहे.

शाळा व्यवस्थापन समितीने नियुक्त केलेल्या महिला कंत्राटदाराकडून प्राप्त आहार विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे काम करीत होत्या.कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी १६ मार्च २०२० पासून शाळांना सुट्या लागलेल्या असून सदर आहार वाटप करणाऱ्या महिला माहे-डिसेंबर ते मार्च अशा चार महिन्याचे मानधनापासून वंचित असून त्यांच्या उदरभरणा चा एकमेव मार्ग बंद झाल्याने उपासमार होत आहे.
प्रतिक्रिया " शापोआ योजनेत पूर्वी स्वयंपाकी व मदतनीस म्हणून शाळा व्यवस्थापन समितीने नियुक्त केलेल्या महिलांना नवीन योजनेत अन्न वाटपाच्या कामाचे मानधन देण्यासाठी कंत्राटदार, नगर परिषद की जिल्हा परिषद यापैकी नक्की कोण जबाबदार याबाबत संभ्रम आहे त्यामुळेच मानधन जमा झाले नसावे."शरद भांडारकर, केंद्रप्रमुखसमूह साधन केंद्र-वाडी