गोल्हेवाड़ीत तीन लाख रुपये व पाच तोळे सोने लंपास - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

गोल्हेवाड़ीत तीन लाख रुपये व पाच तोळे सोने लंपास
येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला, ता. १८ : तालुक्यातील गोल्हेवाडी (महालगाव ) येथील दिलीप बबन जाधव याच्या मतुलठान रोड लागत राहत्या घरी शुक्रवारी मध्य रात्री जबरी चोरी झाल्याची घटना घडली असून सुमारे ५ तोळे सोन व ३ लाख रुपयांवर चोरट्यानी मारला डल्ला.उन्हाळ्याचे दिवस त्यात घरात गरम होत असल्या कारणाने घरातील सर्व लोक घराच्या छतावर झोपले असता त्याचा फायदा घेत रात्री २:३० च्या दरम्यान चोरांनी घराचे कडी कोंडा तोडून कपाटातील सुमारे ५ तोळे सोन व ट्रॅक्टर घेण्यासाठी जमा करून ठेवलेली ३ लाख रुपये रक्कम अज्ञात चोरांनी चोरी करून पोबारा केला आहे.
चोरी झाल्याचे लक्षात आल्या नंतर लगचे दिलीप जाधव यानी गावचे पोलीस पाटील किरण कोतकर यानी महिती दिली.पोलीस पाटील यानी तत्काळ पोलीस निरीक्षक भवारी साहेब यांना महिती दिली.पोलीस लगेच घटना स्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहेत.