संचारबंदीतही चोरी:दवलामेटीत घरफोडी, चोरट्यांनी चोरली टीव्ही - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ एप्रिल २०२०

संचारबंदीतही चोरी:दवलामेटीत घरफोडी, चोरट्यांनी चोरली टीव्ही


नागपूर /अरूण कराळे:
तालुक्यातील दवलामेटी येथील सिध्दार्थ सोसायटी मध्ये संचारबंदीतही बुधवार १५ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी घरफोडी झाली आहे. 

प्राप्त माहितीनुसार गुरुवार १६ एप्रिल रोजी सकाळी ९.१५ वाजता पोलिसांना माहिती मिळाली की दवलामेटी येथील सिध्दार्थ सोसायटी मधील प्लॉट नंबर १५७ येथील घराची कूलूप फोडल्याची माहिती जागृत नागरीकांनी पोलिसांना दिली.काही दिवसापासून घरमालक छिंदवाडा येथे कामा निमीत्य गेले असल्याची माहिती आहे.दाराचे कूलूप फोडल्याची माहिती मिळताच वाडी पोलिस स्टेशनच्या महीला पोलीस उपनिरीक्षक रेखा संकपाळ,एचसी दिनेश तांदूळकर,अनिल गजभिये,दिलीप आडे घटनास्थळी पोहचले.घराच्या आतमधील सर्व सामान अस्ताव्यस्त झाल्याचे दिसून आले. मध्यरात्री अज्ञात चोरानी हॉल मध्ये असलेले एलएडी (टीव्ही) चोरले असल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात महीला पोलीस उपनिरीक्षक रेखा संकपाळ करीत आहे.