सेवानिवृत्त प्राचार्य शामराव ठवरे यांचे हृदयविकाराने निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ एप्रिल २०२०

सेवानिवृत्त प्राचार्य शामराव ठवरे यांचे हृदयविकाराने निधन


संजीव बडोले/नवेगावबांध
दिनांक 23 एप्रिल 2020
नवेगावबांध:-धाबेटेकडी पवनी येथील माता बोदराई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त प्राचार्य शामराव मनिराम ठवरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज दिनांक 23 एप्रिल रोजी गुरुवारला सकाळी 11.00 वाजेच्या दरम्यान निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय साठ वर्षे होते. ते ज्येष्ठ पत्रकार म्हणून या परिसरात ओळखले जात होते. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता. माता बोदराई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. राहुल शिक्षण संस्थेचे सचिव होते. डोंगरगाव खजरी येथील विक्रम बाबा विद्यालयाचे ते संचालक होते.त्यांच्या निधनामुळे धाबेटेकडी पवनी परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे माजी सदस्य होते.नाट्यकलेचा त्यांना छंद होता. शंभराहून अधिक नाटकात त्यांनी अभिनय केला. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर उद्या दिनांक 24 एप्रिल रोज शुक्रवारी सकाळी 10.00 वाजता स्थानिक स्मशान घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.