डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्य ग्रंथाकरिता कविता आमंत्रित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ एप्रिल २०२०

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्य ग्रंथाकरिता कविता आमंत्रितचंद्रपूर / चिमूर
शब्ददान प्रकाशन नांदेडच्या वतीने "महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्य ग्रंथाचे" प्रकाशन करण्यात येणार असून या ग्रंथाकरिता कवींनी आपली एक कविता पाठविण्याचे आवाहन नियोजित ग्रंथाचे संपादक, प्रकाशक प्रा. अनिलकुमार दवणे यांनी केले आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्य ग्रंथामध्ये सुमारे दहा हजार कवितांचा समावेश करून जागतिक स्तरावर एकमेव ग्रंथ म्हणून नोंद व्हावी हा उद्देश आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर स्वतः लिहिलेली एकच कविता हाताने लिहून किंवा संगणक टायपिंग करून तथा यापूर्वी प्रकाशित झाली असेल तर फोटो काढून आपली कविता ९८९०३८१९५८ या व्हाटसअप क्रमांकावर पाठवावी. कृपया याबाबत स्वतंत्र फोन करू नये. कविता प्राप्त होताच सबधीताना कळविण्यात येईल अशी माहिती प्रा. अनिलकुमार दवणे यांनी दिली आहे.