महिमा सप्तश्रुंगीचा... - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ एप्रिल २०२०

महिमा सप्तश्रुंगीचा...

ध्वजा वणीच्या गडावरी
आईचा बघा फडकला
चैत्र नवरात्रीचा कैसा
जागर सुरू की जाहला...

जमले भक्त पदयात्रेने
किती दूरदूर देशावरुनी
उदोउदो मातेचा केला
कपाळी मळवट भरुनी...

रुप साजरे पाहून आईचे
भक्त दुःखे सारी भुलती
मनास शांती लाभुनी कैसे
हर्षे, आनंदाने झुलती...

थोर महिमा आईचा हा
कृपाप्रसाद भक्तां लाभे हो
संकटातुनी तारी सर्वांस
सुखसमृद्धी घरी नांदे हो...

भक्तीभावाने वंदन आई
आशीर्वाद तुझा लाभू दे
रक्षण करते या जगताचे
आम्हा उतराई गं होऊ दे...

विजया पाटील,
विषय शिक्षिका नवापूर
मो.क्र.-9422376396