परभणीत कोरोनाचा पहिला पॉझीटीव्ह रुग्ण आढळला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ एप्रिल २०२०

परभणीत कोरोनाचा पहिला पॉझीटीव्ह रुग्ण आढळला

शहरात मोठी अस्वस्थताः प्रशासन हायअर्लट


प्रतिनिधी। परभणी: गोविंद मठपती
गेल्या 15 दिवसांपुर्वी पुण्यातून परतलेल्या एका युवकास कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून याप्रकाराने जिल्हा प्रशासन अक्षरक्षः खडबडून जागे झाले आहे.
लॉकडाऊन पहिल्या टप्प्यात 21 दिवस या जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असणारा एकही रुग्ण आढळला नाही. जिल्हा प्रशासनाने, आरोग्य विभागाने या संदर्भात कमालीची दक्षता बाळगली. परिणामी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.असे चित्र असतांना जिल्हा शासकीय रुग्णालयात संशयित म्हणून दाखल केलेल्या एका युवकास कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल गुरूवारी(दि.16) सकाळी ये़वून धडकला. त्यामुळे आरोग्य अधिका-यांसह महसुल व पोलिस प्रशासन कमालीचे हादरले आहेत. रुग्णालयात दाखल केलेल्या त्या युवकाने 15 दिवसांपुर्वीच परभणी गाठली होती. तो कुटुंबिया समवेत राहत होता. सर्दी, खोकलाच्या तक्रारीमुळे त्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. तेव्हा वैद्यकीय अधिका-यांनी त्याचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्याचा अहवाल गुरूवारी प्राप्त झाल्याबरोबर वैद्यकीय अधिका-यांनी त्या रुग्णांची स्वतंत्र अशी व्यवस्था केली असून त्यांच्यासह वैद्यकीय निगराणी ठेवून आहेत.

कुटुंबियांची तपासणी होणार
त्या 21 वर्षीय युवकांच्या कुटुंबियांची तपासणी होणार असल्याची माहिती हाती आली असून यसंदर्भात आरोग्य विभागाने अधिक तपशील दिला नाही. त्या युवकाचे नाव, त्याचा पत्ता, भाग वगैरे बाबत गुतप्ता बाळगली जाणार आहे.