उध्दव हेडमास्तर ... - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ एप्रिल २०२०

उध्दव हेडमास्तर ...


महाराष्ट्रात कोरोना विरोधी लढा सुरू आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व आहे. 21 दिवसाचा लाँकडाऊन १४ एप्रिल रोजी संपला. तो पुन्हा ३ मे पर्यंत वाढविला. बांद्रा व मुंब्रा भागात हजारों कामगार एकत्र आले. गावाकडे जावू द्या.या मागणीने पोलिसांची तारांबळ उडाली.पोलिसांनी बळाचा वापर केला. लाठीमार केला. तेव्हा जमाव पांगला. हे कळताच उध्दव ठाकरे बाहेर आले. लोकांशी संवाद साधला. तेव्हा चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश़्वास, शब्द फेकीतून जाणवणार करारीपणा व संयम दिसला. कोणताही अविर्भाव न आणता विरोधकांना ठणकावले. राजकारण नको. त्यासाठी उभे आयुष्य आहे. बळीराजाची चिंता आहे. शेतीचा हंगाम जवळ आहे. त्यांची लगबग आहे. त्यासाठी बियाणे, शेतीची अवजारे, खते खरेदी-विक्री दुकाने सुरूच राहणार. शेत उत्पादने वाहतूकीवर बंदी नाही. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा खुला आहे. काही उद्योग सुरू करावयाचा मानस आहे. घाबरण्याचे कारण नाही.

डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो. त्यांची आज जयंती आहे. ही जयंती आपण घरात थांबून साजरी केली. त्याबाबत सर्व भिमसैनिकांना धन्यवाद. दरवर्षी लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर येतात. दर्शन घेवून शांततेने परत जातात. यंदा कोरोनामुळे आले नाहीत.चैत्यभूमी व अन्य स्थळं सुनीसुनी दिसली. डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा विषमते विरूध्द लढा दिला. आज आपण विषाणू विरोधात लढत आहोत. यात सर्वांची साथ दिसली. एकजूट दिसली. हे युध्द जिकू. हे सांगणार् चित्र आहे.
पुणे, मुबई विस्तारत आहे. किंबहुना एकच झालेत. १० जिल्हे कोरोना मुक्त आहेत. तिथे बंदी उचलता येते काय? हे बघतो .काही अभ्यासगट तयार केले. या गटात विद्वान डाँक्टर, उद्योजक, अर्थशास्त्री आहेत. रघुनाथ मासलेकर यांचा उल्लेख केला.२१ हजारावर लोकांनी सेवा देण्याची तयारी दाखविली. त्यात निवृत्त जवान, डाँक्टर, परिचारिका, प्रोबेशनर आहेत. त्यांच्याही सेवा घेवू.

महाराष्ट्र देशाला नाही. जगाला दिशा दाखविलं. प्लाज्मा उपचाराची परवानगी मागितली. नवे प्रयोग सुरू आहेत.यश मिळेल. काही जण पैसे काढण्याचे धंदे सांगतात. असा विरोधकांचा चिमटा काढला. सव्वा कोटी लोकांनी कालपर्यंत धान्य उचलले. रोज ८० हजार शिवभोजन ताट वाढले जात आहेत. साडे सहा लाखांवर परप्रांतियांना रोज जेवन वाढले जाते. या उपलब्धी सांगत-सांगत बांद्रा घटनेवर आले. १४ नंतर ट्रेन सुरू होतील .हे समजून बांद्रात गर्दी झाली. मर्जी के खिलाप आप लाँक में नही. यह खुलेगा. तुम्ही हिंदुस्थानी आहात. तुमच्याशी मुकाबला नाही. घाबरू नका. महाराष्ट्र तुमची काळजी घेत आहे.या शब्दात एकीकडे हातघाईवर आलेल्या कामगारांना दिलासा दिला. दुसरीकडे त्यांच्याशी खेळू नका. त्यांच्या भावनेशी खेळाल तर सुटणार नाही .या शब्दात भडकवणाऱ्यांना तंबी दिली. काही आगीचे बंब आहेत. त्यांना आग लावू देणार नाही. हे शब्द कोणासाठी होते. याची चर्चा रंगलीआहे. हातवारे करीत बोलणारे अर्थ समजले असावेत. मालेगावचा उल्लेख केला. मुल्ला-मौलवी सोबतही बोलतो. सर्वांसोबत चर्चा करतो. ३५ हजार कोटीवर उत्पादन बुडते . वितरणाचीही साखळी तुटली आहे. धंदे बंद झाले. कोरोना युध्द जिंकल्यावर. राज्याला पुन्हा उभारणीचे युध्द लढावे लागेल. त्याची सुरवात आतापासून केली. अभ्यासगट त्यासाठी आहेत. मुंबईतील गेट वे आँफ इंडिया आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाचा उल्लेख करीत म्हणाले, ते नेहमी म्हणत, मुंबईची दारे सर्वासाठी खुले आहेत.आँव जाँव घर तुम्हारा है. या गर्भित इशाऱ्याची आठवण दिली.औरंगाबादचा उल्लेख एकदा संभाजीनगर केला. यातून मुद्दे अभी बाकी है.पुराने स्कुल के हम ही हेडमास्टर है .हेच तर त्यांना सांगावयाचे नाही ना? ते काही असो. नवे रिंगमास्टर शिकाऊ नाहीत.यांचे संकेत आहेत.

- भूपेंन्द्र गणवीर, ज्येष्ठ पत्रकार