करोना सर्वेक्षनाला दांडी मारणाऱ्या शिक्षकांना कारवाईची नोटीस - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

करोना सर्वेक्षनाला दांडी मारणाऱ्या शिक्षकांना कारवाईची नोटीस

जुन्नर नगर पालिकेची कारवाईची नोटीस


जुन्नर /आनंद कांबळे

करोनाचा संसर्ग व प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणुन जुन्नर नगर पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षनाला दांडी मारनाऱ्या शिक्षकांना जुन्नर नगर पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावून आपल्यावर फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारना केली आहे. नगर पालिकेच्या मुख्याधिकारी तथा सनियंत्रण आधिकारी जयश्री काटकर यांनी या नोटीस बजावील्या आहेत. व आरोग्य अधिकारी प्रशांत खत्री यांनी ही माहिती दिली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी शहर पातळीवर शासकीय-निमशासकीय शिक्षक कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी भेट देऊन बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. तसेच सर्दी खोकला, ताप घसा खवखवणे  व नयुमोनीयाचा  आजारांची लक्षणे आदींचे सर्वेक्षण करण्याचे सुचना देण्यात आल्या होत्या.  जुन्नर नगरपालिकेने शहरातील माध्यमिक शाळा,नगरपालिकेच्या  प्राथमिक शाळा ,खाजगी प्राथमिक शाळा, यांच्या  शिक्षकांना सर्वेक्षणासाठी चे आदेश दिले होते . सर्वेक्षणासाठी जवळपास 70 शिक्षक उपस्थित राहिले होते. सर्वेक्षणासाठी दिनांक 12 रोजी सकाळी  बोलविण्यात आल्यानंतर आवश्यक ते साहित्य  दुपारी देण्यात येऊन  सायंकाळी पर्यंत  लगेच सर्वेक्षणाचा अहवाल देण्यास सांगितले होते .सर्वेक्षण वेळेत व्हावे यासाठी एका वॉडात चार ते पाच शिक्षकांची  नेमणूक करण्यात आली होती.मागील महिन्यात करण्यात आलेल्या  सर्वेक्षणासाठी  देखील बऱ्याच  शिक्षकांनी दांडी मारली होती. आतादेखील या सर्वेक्षणात उपस्थित असलेल्या शिक्षकांनी अनुपस्थित असलेल्या शिक्षकांचे काय करणार? आम्हीच नेहमी सर्वेक्षण करायचे का अशी भूमिका नगरपालिका प्रशासनाकडे मांडली होती.      सर्वेक्षणाचे आदेश दिल्यानंतर मुख्यालय सोडुन बाहेरगावी असलेले शिक्षक देखील देखील सर्वेक्षणासाठी हजर झाले होते. ऐकून ६०  शिक्षक उपस्थित होते. तरीपण  जवळपास अठरा शिक्षकांनी सर्वेक्षणासाठीचे दिलेले आदेश धाब्यावर बसवून सर्वेक्षणाला दांडी मारली .या अनुपस्थित शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंध कायदा अन्वये कामामध्ये कसूर केल्याने कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये तसेच साथ रोगा  सारख्या महत्त्वाच्या कामात बेजबाबदारपणे दाखवल्यामुळे फौजदारी कारवाई करण्यात का येऊ नये याचा खुलासा देण्याचे पत्र नगरपालिकेने दिले आहे .अजूनही काही  अनुपस्थित शिक्षकांची नावेसंबधीत शाळा कडून घेण्यात येत आहे.****चोकटीसाठी मजकुर(१)  मागील महिन्यात केलेल्या  सर्वेक्षणात जवळपास 3८५  नागरिक बाहेरगावावरून आले असल्याचे  पुढे आले होते. त्यांना होम  क्वारंटाईन  रहाण्याच्या आदेश  नगरपालिकेने दिले  होते.या नागरिकांचा होम  क्वारंटाईन कालावधी संपलेला आहे.असे आरोग्य अधिकारी प्रशांत खत्री यांनी सांगितले. (२)दिं १२ रोजी झालेल्या सर्वेक्षणात एकूण १७ वॉर्ड मध्ये ३८७७कुटुंबांचा सर्वे करण्यात आला. शहरात  17350 नागरिक आहेत. ७० वर्ष  वयाचे पुढील २२९५ नागरिक आहेत .५१५  नागरिकांना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास आहे.फक्त एका नागरिकाला सर्दी ताप आहे.   दिनांक सात तारखेनंतर बाहेरगावरून आठ नागरिक शहरात आले असल्याचे  स्पष्ट झाल आहे.  पुणे येथून आलेल्या एका डॉक्टर महिलेने  सात तारखे नंतर जुन्नर  शहरात येऊन देखील नगरपालिकेला याची  माहिती  दिली नसल्याचे या सर्वेक्षणात उघड झाले. (३) शहराच्या काही भागात सर्वेक्षना  साठी नागरीक सहकार्य करत नसल्याचे तक्रारी शिक्षकांनी केल्या. अशा नागरीकांवर देखील कारवाई करणे गरजेचे आहे. (४)उपस्थित  शिक्षकांनी जबाबदारीने सर्वेक्षणाचे काम केले .एका खाजगी अनुदानित शाळेतील मुख्याध्यापिकेने सर्वेक्षनाची निकड बघुन शाळेतील शिक्षक बाहेरगावी असल्याने विनाअनुदानित कर्मचाऱ्यांना पैसे देऊन सर्वेक्षण करून घेतले .