राष्ट्रवादीचा नवेगावबांध येथे प्रभाग क्रमांक दोन मध्ये दहा गरजू कुटूंबाना मदतीचा हात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ एप्रिल २०२०

राष्ट्रवादीचा नवेगावबांध येथे प्रभाग क्रमांक दोन मध्ये दहा गरजू कुटूंबाना मदतीचा हात
संजीव बडोले/नवेगावबांध
दिनांक 23 एप्रिल 2020
नवेगावबांध:-covid-19 या कोरोनाव्हायरस च्या प्रादुर्भावामुळे उपाय योजनेचा एक भाग म्हणून, गेल्या महिन्याभरापासून राज्यात संचारबंदी व लॉकडाऊन सुरू आहे . त्यामुळे रोजंदारी मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. लोक बेरोजगार झाले आहेत.हाताला काम नाही. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या वतीने खासदार प्रफुलजी पटेल यांच्या सुचनेनुसार मौजा नवेगावबांध येथील वार्ड क्रमांक 2 मध्ये गरजु दहा कुंटूबांना जीवनोपयोगी अन्नधान्यांच्या राशन कीट चे वाटप करण्यात आले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात कोरोणा प्रभावामुळे विस्कळीत झालेल्या निराधार गरीब कुटुंबांना नवेगाव बांध येथील प्रभाग क्रमांक दोन मधील दहा कुटुंबांना धान्य व जीवनावश्यक वस्तू च्या किट आज वाटप करण्यात आल्यात. सदर प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे व बुथ प्रमुख हरिभाऊ पोवळे व गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. अशा कठीण परिस्थितीत झालेल्या मदतीमुळे गावकऱ्यांनी खासदार प्रफुल पटेल यांचे आभार मानले आहे.एक हात मदतीचा या उपक्रमाचा सर्वत्र कौतुक होत आहे. गरजेच्या वेळेस ही मदत मिळाल्याचा आनंद मात्र नागरिकांनी व्यक्त केला.