वाडीत दुप्पट पैसे घेऊन मास्क विक्री करणार्‍या मेडीकलवर पोलिसांचा छापा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ एप्रिल २०२०

वाडीत दुप्पट पैसे घेऊन मास्क विक्री करणार्‍या मेडीकलवर पोलिसांचा छापा

नागपूर : अरूण कराळे:
संपूर्ण देशात कोरोनाचा कहराने सुरू असून सामान्य नागरिकांचे जनजीवन बिघडले असताना या रोगापासून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना मास्क लावायचा आहे.शासनाच्या नियमानुसार उत्पादन शुल्कातच मास्कची विक्री करणे अनिवार्य असताना दुप्पट दाम घेऊन मास्क विक्री करताना पकडल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार वैद्द मापन मापक शास्त्र व गुन्हे शाखा नागपूर यांनी वाडीतील मेडिकल दुकानात दाम दुप्पटिने मास्क विक्री केल्या जात असल्याची कुणकुण लागली असतांना शुक्रवार ३ एप्रिल रोजी धडक तपासणी मोहीम राबवून दत्तवाडी येथील जयलक्ष्मी फार्मसी व चिंतामणी फार्मसी येथे ग्राहक बनून गेले असता ३ प्लाय मास्क १६ रुपयाच्या किमतीचा ३० रुपयाला विक्री करताना सापडले.दुकानात एकूण १९ मास्क होते.दोन्ही मेडिकल स्टोर्सवर पाच हजार रुपयाची दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. 

उपरोक्त कार्यवाही गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुख्तार दाऊद शेख,वैद्द मापन मानक शास्त्र निरीक्षक विजय धोटे,वैद्द मापन मानक शास्त्र उमेश गौर,गुन्हे शाखा विभाग एपीआय संकेत चौधरी,एसआय वसंता चवरे,प्रकाश वानखेडे,राहूल इंगोले,मंगेश मडावी,अरूण चंदणे,शत्रुघ्न कडू,निलेश वाडेकर,नरेश सहारे आदींनी केली. बातमी लिहीपर्यंत गुन्हा दाखल व्हायचा होता .