कारंजा नगर पंचायत ची ८५ लोकांवर दंडात्मक कारवाई करून:३०६५० दंड वसूल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ एप्रिल २०२०

कारंजा नगर पंचायत ची ८५ लोकांवर दंडात्मक कारवाई करून:३०६५० दंड वसूल

मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची माहिती
कारंजा(घाडगे):
जगभरात कोरोना व्हायरसचे संकट घोंगावत आहे. संसर्ग होऊ नये म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आह. कारंजा शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियम मोडणाऱ्या ८५ लोकांवर नगर पंचायत कारंजा(घाडगे) नि दंडात्मक कारवाई करत ३०६५० रुपये दंड वसूल केला असल्याचे मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी सांगितले कि यात रस्त्यावर थुंकणे, सोशल डिस्टंसिंग न पाळणे, मास्क न लावता रस्त्यावर मोकाट फिरणे, दुचाकीवर विनाकारण फिरणे आदी करिता दंड ठोठावला.

 जिल्हाधिकारी यांनी संसर्गजन्य रोगावर नियंत्रण आणण्याकरिता कोरोना पथकाची नेमणूक कारंजा शहरात मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्या नेतृत्वात केली. सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन व्हावे याकरिता गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवणे, विनाकारण घराबाहेर दुचाकीवर फिरणे, जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने यांच्या वेळा, पेट्रोल पंप, आदी सूचना नगरपंचायत द्वारे दिल्या जात आहे. 

तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुद्धा केल्या जात आहे. सदर निगराणी पथकात प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गाडगे, रामचंद्र नरवडे, अशोक जसुतकर, रुस्तम शेख, प्रवीण दिवाने प्रभाकर नासरे नगर पंचायत कर्मचारी सह कार्य करीत आहे .