बोकटे येथिल श्री काल भैरवनाथ यात्रा, कालाष्टमी उत्सव कोरोनामुळे घरोघरी पुजन करून साजरा! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ एप्रिल २०२०

बोकटे येथिल श्री काल भैरवनाथ यात्रा, कालाष्टमी उत्सव कोरोनामुळे घरोघरी पुजन करून साजरा!येवला प्रतिनिधी/विजय खैरनार

येवला, ता. १४ : तालुक्यातील श्री क्षेत्र बोकटे ता.येवला येथिल जागृत देवस्थान भगवान श्रीकाल भैरवनाथांची यात्रा ह्या वर्षी दि. १४ एप्रिल २०२० रोजी होती, भाविक दर्शन घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहात होते.परंतु लाॅकडाऊन असले कारणाने कोणीही गर्दी केली नाही,फक्त पुजारी करडे यांनी मंदिरात विधिवत पूजन केले. तर सर्वांनी मंदिरात न येता आपआपल्या घरोघरी थांबले व फोटोचे पुजन करून कालाष्टमी साजरी केली. श्रीक्षेत्र बोकटे येथे शेकडों वर्षांपासून चालत आलेली परंपरा आणि सालाबादप्रमाणे भरणाऱ्या भगवान श्री काल भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या कालाष्टमीच्या यात्रेनिमित्त नाशिक, नगर, संभाजीनगर (औरंगबाद) जिल्ह्यातील लाखो भाविक येत असतात.
भगवान श्री काल भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्रीक्षेत्र बोकटे पुण्यनगरीतील मंदिरात कालाष्टमी निमित्ताने भरणाऱ्या यात्रेला बोकटे,देवळणे दुगलगावसह असंख्य भाविक,भक्तांनी मंदिर व परिसरात गर्दी न करता आपल्या घरीच सर्वांनी गोड पदार्थ तयार करून गुढ्या उभाराल्या,प्रत्येकाने स्वतः च्या घरातील श्री काल भैरवनाथांच्या फोटोलाच नैवद्य दाखवुन,पुष्पहार अर्पण केले व मानमानता करून विधिवत पूजन केले.तसेच आपल्या कुटुंबासह इतरांनांही सुखी ठेवण्यासाठी सर्वांनी प्रार्थना केली व कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लवकर नष्ट होण्यासाठी बोकटे पंचक्रोशीतील भाविकांनी घरातूनच भगवान श्रीकाल भैरवनाथाला साकडे घातले.तसेच सरला बेट येथून महंत रामगिरीजी महाराज व पुणतांबा येथून जाधवराया महाराज यांनी फोन वरुन सर्व भाविकांना आशीर्वाद दिले. तसेच सर्व यात्रेकरांना घरात प्रतिमा पुजन करून घरीच थांबण्याचे आव्हाहन केले.त्याच प्रमाणे भुजबळांच्या वतीने स्वीसहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी परिस्थिती चा आढावा घेतला.
तसेच बोकटे येथील नाशिक जि.प.सदस्य महेंद्र काले,कृषी उत्पन्न बाजार समिती अंदरसुल सभापती मकरंद सोनवणे,भाजप नेते बाबा डमाळे,झुंजाराव देशमुख,अरुण काळे,राजेंद्र मोरे,सिताराम दाभाडे,रावसाहेब लासुरे,महेंद्र जाधव,उपसरपंच प्रताप दाभाडे,भालचंद्र त्रिभुवन सोसायटी संचालक किरण दाभाडे,सोसायटी संचालक हितेश दाभाडे,गुलाबराव दाभाडे,संभाजीराव दाभाडे,रामनाथ दाभाडे,बबन घोडेराव (गुरुजी),ताराचंद मोरे,ग्रामसेवक मोरे भाऊसाहेब,मंदिराचे पुजारी अरुण करडे,गोरखनाथ करडे.आदींना भाविकां गर्दी न करण्याचे आव्हान केले.व फोनवर,विचारपूस करून मेसेज फिरवले सर्वांना घरात थांबण्याचे आव्हान केले.तसेच येवला ग्रामिण पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी बोकटे येथे मंदिराची पहाणी केली व मंदिर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून एक पोलीस पथक तैनात केले. त्यात ASI तांदलकर सो.पो. हवालदार पगार,निकम, हेंबाडे,पारधे आदी पोलिस कर्मचारी गावाच्या आरोग्याच्या, जनतेच्या हितासाठी मंदिर परिसरात तैनात केले होते.