Home_Quarantine ची एक Positive कविता - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० एप्रिल २०२०

Home_Quarantine ची एक Positive कविता


बाहेरच्या जगाचे जेव्हा लॉक_डाऊन झाले त्याचवेळी घर मात्र पुन्हा जिवंत झाले.
Home_Quarantine ची एक Positive कविता...

"🏠 घरपण येऊ लागले.."

घरात घरचे जसे परतले,
घरास घरपण येऊ लागले !

आजोळीच्या परी कथेतील,
रूप गोजिरे दिसु लागले !

माझे-माझे करणार्‍याचे,
बंधन तुटले हव्यासाचे !

बडेजाव ते खोटेनाटे,
तुटून पडले असे दिखावे!

ना त्यांचा जो नात्यांचा झाला,
सुखदुःखाचे समजुन जगणे!

फांद्यांवरती आले परतून,
जे पक्षी समुद्रापार उडाले !

तुळस अंगणी पुन्हा बहरली,
लाड पुरवले उंबरठ्याने !

माणुस काही माणसातले,
माणुस आता होऊ लागले!

धकाधकीचे जीवन थोडे,
श्वासं मोकळे घेऊ लागले !

घरात घरचे जसे परतले,
घरास घरपण येऊ लागले !!

✍️ चैतन्य मातुरकर - चैतन्यमय्
ब्रम्हपुरी, जिल्हा- चंद्रपूर
मो. ९२२५२०११८०