स्थलांतरीत नागरिकांवर होम कोरंन्टाईन शिक्के मारू नका - आयुष प्रसाद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ एप्रिल २०२०

स्थलांतरीत नागरिकांवर होम कोरंन्टाईन शिक्के मारू नका - आयुष प्रसाद

जुन्नर /आनंद कांबळे
ग्रामीण भागात पुणे /मुंबई व इतर ठिकाणांवरुन स्थलांतरीत झालेल्या नागरिकांवर होम कोरंन्टाईन शिक्के मारण्यात येवू नयेत असे आदेश पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.नगरपालिका व ग्रामीण भागात पुणे /मुंबई व इतर भागातून लोक स्थलांतरीत होत आहेत. आंतरराष्ट्रीय व देशातर्गत कोरानाच्या विषाणामुळे संसर्गबाधीत रुग्ण आढळत आहेत. शहरातील लोक आपले कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी स्थलांतरीत होत आहेत. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या भागात लोक येत आहेत. या स्थलांतरीत लोकांची सखोल चौकशी न करता सरसकट होम कोरंन्टाईन शिक्के मारणेत येवून घबराटीचे व गैरसमजुतीचे वातावरण निर्माण करण्याचा असामाजिक घटक करत आहेत. या वस्तूस्थितीचा विचार करुन परगावाहून आलेल्या लोकांच्यावर होम कोरंन्टाईन शिक्के मारु नयेत असे आदेश देण्यात आलेले आहेत.
पुणे जिल्हातील नगरपालिका व ग्रामीण भागात परगावाहून लोक आपआपल्या गावाकडे येत आहेत. अशा लोकांनी होम कोरंन्टाईन बाबतच्या सूचनाचे पालन करावे. तसेच वैद्यकीय पथकांकडून तपासणी करण्यात यावी अशा सूजना गटविकास अधिकारी ,तहसिलदार व मुख्याधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.