ग्रामपंचायतची कुऱ्हाडीने तोडफोड; दरवाजा तोडला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ एप्रिल २०२०

ग्रामपंचायतची कुऱ्हाडीने तोडफोड; दरवाजा तोडला



भद्रावती तालुक्यातील मुधोली येथील घटना

भद्रावती (प्रतिनिधी)
गावातील एका इसमाकडून ग्रामपंचायत कार्यालयात जावून कुर्‍हाडीच्या सहाय्याने दरवाजा तोडून आतील साहित्याची नासधूस करण्याची घटना 17 एप्रिल रोजी भद्रावती तालुक्यातील मुधोली या गावात घडली.

मुधोली येथील इसम राजेंद्र पुरूषोत्तम गायकवाड हा शुक्रवारी सकाळी 7 वाजता गावातील ग्रामपंचायत कार्यालयात आला. त्यावेळी त्याच्या हातात कुर्‍हाड होती.

या कुर्‍हाडीच्या सहायाने त्याने दरवाजा तोडला. त्यानंतर आत प्रवेश करून लोखंडी आलमारीचे काच, सरपंचाच्या टेबलवरील काच, प्लायवूड तोडले. तसेच खिडकीच्या बाहेर असलेल्या कुलरची फेकाफेक केली. त्यामुळे ग्रामपंचायतीचे 30 हजारांचे नुकसान झाले आहे.