शासनाने पत्रकारांना विमा सुरक्षा व अर्थसहाय्य करावे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ एप्रिल २०२०

शासनाने पत्रकारांना विमा सुरक्षा व अर्थसहाय्य करावेपत्रकार संघाचे मुख्यमंत्र्याकडे मागणी

निफन्द्रा (रवींद्र कुडकावार) प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर्स, प्रशासकीय यंत्रणा, पोलीसा प्रमाणे पत्रकार देखील जीवाची कोणती पर्वा न करता कोरोना च्या लढ्यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे पत्रकारांसाठी शासनाने विमासुरक्षा आणि आर्थिक मदतीचे विशेष पॅकेज द्यावे अशी मागणी सावली येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
कोरोना विषाणूच्या महामारी चे  संकट देशावर आणि महाराष्ट्रावर आले असून त्याचा प्रतिबंध करण्यासाठी सरकारने लॉकडाऊन चा निर्णय घेतला. तथापि,  डॉक्टर्स, प्रशासकीय यंत्रणा,  पोलीसा प्रमाणे पत्रकार,  छायाचित्रकार देखील आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाशी दोन हात करण्यास आणि जनजागृती करण्यात मैदानात उतरले आहे. पत्रकारांना शासनाने कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक सुरक्षा किट,  विमासुरक्षा कवच देण्याची गरज आहे. शिवाय लॉक डाऊनमुळे पत्रकार देखील आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कोरोना  विषाणूच्या आपत्कालीन परिस्थितीत पत्रकार आपले कर्तव्य अत्यंत जबाबदारीने पार पाडीत असल्यामुळे आर्थिक मदतीचे विशेष पॅकेज देऊन विमासुरक्षा देखील मिळवून द्यावे. अशी मागणी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल स्वामी, उपाध्यक्ष सतीश बोमावार, सचिव लखन मेश्राम, प्रसिद्धीप्रमुख आशिष दुधे, प्रवीण गेडाम, दिलीप फुलबांधे,  शितल पवार, विजय कोरेवार, अनिल गुरनुले, सुधाकर दुधे, सुजित भसारकर, राकेश गोलेपल्लीवार, खौजिण्द्र येलमूले, सुनील दहेलकार, आशिष पुण्यपवार, रवींद्र कुडकावार यांनी केली आहे