पिपरी नारंडा येथील गावातील गोठ्याला आग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ एप्रिल २०२०

पिपरी नारंडा येथील गावातील गोठ्याला आग
अनर्थ टळला हे विशेष

गौतम धोटे : आवारपूर
कोरपना तालुक्यातील पिपरी येथील गावातील एका गोठ्याला लागलेल्या आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झाला. ही घटना आज 29 एप्रिल, बुधवारी सायंकाळी सहा वाजता दरम्यान घडली.
आगीत गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य, शिवार फाटा, कडबा आदी जळून खाक झाला. सदर गोठा किशोर पावडे यांच्या मालकीचा आहे. आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
सदर घटनेचा पंचनामा मंडळ अधिकारी पचारे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी दिलीप देठे , हरिचंद्र अहिरकर यांनी केला.आग विझवण्यासाठी तीन अग्निशमन वाहन दाखल आवारपूर येथील सिमेंट कंपनीच्या अधिकारी यानी छान कार्य केले जाते आणि बऱ्याच वेळी मद्यथीसाठी सर्वात पुढे असते . होते. वृत्त लिही पावेतो आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. गडचांदूर पोलीस ठाण्यात तील पोलीस साहेब पाटील यांनी सिमेंट कपणीला वेळीच फोनवरून अग्निशमन दलाच्या वाहनासाठी अदिकच पर्यंत केले हे विशेष.