कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहजयोग ऑनलाईन ध्यान उपक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ एप्रिल २०२०

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहजयोग ऑनलाईन ध्यान उपक्रम

५९ देशातील साधकांना होणार लाभ

खापरखेडा-प्रतिनिधी
संपूर्ण जगात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जगाला लॉकडाऊनच्या परिस्थितीतून जावे लागत आहे त्यामुळे सर्व सामान्य जनतेत भिती, चिंता व नैराश्याची भावना निर्माण झाली आहे.
परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी यांनी सुरू केलेल्या सहजयोग ध्यान साधनेच्या माध्यमातून गेल्या पन्नास वर्षात असंख्य साधकांना ह्या नकारात्मक व नैराश्यपूर्ण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत होत आहे साधकांना आरोग्य, शांती, समाधान व आनंद प्राप्त होऊन ते संतुलित जिवन जगत आहेत.
जगातील लॉक डाऊनच्या कठीण काळातजगातील ५९ देशातील साधारण दोन लाख साधक दररोज एकाच वेळी म्हणजे सकाळी ५.३० व सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन ध्यानाच्या माध्यमातून आपल्या घरी बसून ध्यानसाधना व विश्वकल्याणाची प्रार्थना सामूहिक रित्या करीत आहेत ध्यानधारणा व सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या चैत्यन्य लहरीतून संसर्गजन्य विषाणूचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते याची प्रचिती नियमित ध्यानधारणा करणारे सर्व साधक अनुभव करीत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात सर्व साधक आपल्या घरात बंदिस्त सहजयोग ध्यानसाधना शिकत आहेत महाराष्ट्रात कार्यरत १३४४ ध्यानकेंद्र आणि सर्व सहजयोगी साधक १५ मार्च पासून राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टिंगचे नियम पाळत आहेत सहजयोग संस्थापिका श्री माताजी निर्मलादेवी यांनी १९८० साली सांगितले होते संपूर्ण विश्वावर जेव्हा आपत्ती येईल तेव्हा विज्ञान आणि देवीय ज्ञान एकत्र येऊन जगाला संकटातून बाहेर काढेल त्यामूळे सहजयोग परिवार सज्ज असून सर्व नागरिकांना विनामूल्य ध्यान ऑनलाईन माध्यमातून शिकविले जात आहे हजारोच्या संख्येने उपक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग संस्थेच्या वतीने करण्यात आले असून यासंदर्भात
विवेक काळे, धनंजय खळतकर, कविता आटे यांच्याशी या क्रमांकाच्या ८३०८०६०००६,  ९६००८२७९४४ भ्रमणध्वनीवर साधता येईल.