कोहलगाव येथे घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ एप्रिल २०२०

कोहलगाव येथे घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली
संजीव बडोले/नवेगावबांध
दिनांक 14 एप्रिल 2020
नवेगावबांध:-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती ग्रामपंचायत कोहलगाव येथे साजरी करण्यात येऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
covid-19 या कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी असल्यामुळे एका साध्या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ग्राम पंचायत कार्यालय कोहलगांव येथे यावेळी सरपंच माधुरीताई गुरुदेव चांदेवार, प्रेमलालजी लांजेवर ग्रामपंचायत सदस्य , तटांमुक्ति समिती अध्यक्ष हरीभाऊ नैताम, श्रीराम राऊत, गुरुदेवजी चांदेवार, राजेश खंडाईत, संगणक परिचर रवि वाढई उपस्थित होते.