जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे रुग्णालयात भोजनदान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ एप्रिल २०२०

जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे रुग्णालयात भोजनदान
गडचिरोली/ प्रतिनिधी
जिल्हा महिला व बाल रुग्णालयात जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील मोठ्या संख्येने  रुग्ण आरोग्य तपासणीसाठी येत असतात. रुग्णासोबत त्यांचे नातेवाईक येत असतात. परंतु देशात व महाराष्ट्रात कोरोणा विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन व संचारबंदी लागू केल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांच्या भोजनाची अडचण निर्माण झाली. ही बातमी कळताच गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने  पुढाकार घेऊन सामाजिक दायित्व म्हणून दि. १ एप्रिल ला सकाळी व सायंकाळी रुग्णाच्या नातेवाईकांना भोजन देण्याचा निर्णय घेतला.
                                     या आवाहनाला जिल्ह्यातील मुख्याध्यापक बंधुभगिनी यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन रूग्णालयात दोन्हीही वेळी २०० रुग्णाच्या नातेवाईकांना जेवण  देण्यात आले.
    सदर भोजनदान उपक्रमास जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री संजय नार्लावार, सचिव श्री टी.के. बोरकर, कोषाध्यक्ष संजय भांंडारकर, सदस्य श्री मनिष शेटे, श्री मुकुंद म्हशाखेञी, श्री सुनिल पोरेड्डीवार व सौ.संध्या  पोरेड्डीवार, सागर म्हशाखेञी, श्री किशोर झाडे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष श्री जयंत येलमुले, श्री अशोक वाकुडकर, श्री सुर्यकांत सोनटक्के,श्री  निखील तुकदेवे, तसेच अंगारा येथील मुख्याध्यापक श्री पारधी यांचे सहकार्य लाभले. तसेच जिल्ह्यात आपतकालीन परिस्थितीत रक्ताचा तुडवडा जाणवत असल्याने जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या मदतीने रक्तदान शिबिर लवकरच घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.