येवल्यातील बाजारात ६०० मास्कचे वितरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ एप्रिल २०२०

येवल्यातील बाजारात ६०० मास्कचे वितरण
येवला, दि.२२ : सम्पूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार मजला असून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे सदर रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून पूर्णतः लॉक डाउन परिस्थितीत अनेक मजूर व कामगार घरात बसून आहे त्याच्या मदतीला अनेक मदतीचे हात सरसावत असून येवल्यातील स्वामी मुक्ताणंद महाविध्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून सुमारे ६०० मास्क शिवून येवल्यातील आठवडे बाजार तसेच पारगाव,चिंचोडी आदी परिसरात वाटप केले त्या प्रसंगी रा.सो.यो.कार्यकारी अधिकारी प्रा.डॉ.अजय विभाडी,.पी.एन. पाटील, प्रा.बच्छाव, केशव काळे,एकनाथ कोरहळे, अक्षय पेटकर,आदी उपस्थित होते.