शिक्षणासाठी झटणारे हात समाजसेवेसाठी पुढे सरसावले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ एप्रिल २०२०

शिक्षणासाठी झटणारे हात समाजसेवेसाठी पुढे सरसावले


  • आदिवासी, गरीब ,मजुर वर्गासाठी मोफत 12 हजार मास्क वितरण

  • आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचा उपक्रमराजुरा.. (आनंद चलाख )
जिल्हा चंद्रपूर..

कोरोना विषाणूच्या दहशतीखाली संपूर्ण जग हतबल आहे. देश तीन मे पर्यंत टाळेबंद आहे. कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन जिवाचे रान करीत आहे. शहर व गाव पातळीवर यंत्रणा कोरोणा मुक्त राहण्यासाठी धडपडत आहे. अशातच ग्रामीण आदिवासी भागातील नागरिकांचे आरोग्य जोपासण्यासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा व शिवाजी महाविद्यालय यांनी पुढाकार घेतलेला आहे. परिसरातील खेडेगाव, तेलंगाना सिमेलगतचे आदिवासी गावे, झोपडपट्टी क्षेत्र, भाजीविक्रेते ,
मजूर वर्गांना मोफत मास्क वितरित करण्यासाठी शिवाजी महाविद्यालयाच्या गृह अर्थशास्त्र व एनएसएस विभागाने कंबर कसलेली आहे . तब्बल 12 हजार मोफत मास्क वितरणाचे ध्येय ठेवून 20 ते 25 विद्यार्थी दररोज आठ ते दहा तास घरी व महाविद्यालयात काम करीत आहेत.आतापर्यंत सहा ते सात हजार मास्क बनवून वितरित केलेले आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या या इमारतींमध्ये संस्थाचालक ,प्राचार्य प्राध्यापक, विद्यार्थी मास्क तयार करण्यासाठी झटत आहेत. ही बाब इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनासोबत इतर स्वयंसेवी संस्था पुढे आलेले आहेत. देश ताळेबंद झाल्यानंतर स्थलांतरित मजूर वर्ग अनेक ठिकाणी थांबलेला आहे. त्यांच्या आरोग्यासोबत ,जेवणाची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनासोबत स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेतलेला आहे .आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत शिवाजी विद्यालयाच्या इमारतीमध्ये स्थलांतरित मजूरवर्ग थांबलेला आहे. यात वेगवेगळ्या राज्यातील 128 नागरिक थांबलेले आहेत. विद्यार्थ्यांनी गजबजणारी शाळा आज स्थलांतरित मजुरांनी भरलेला आहे . त्यांच्या देखभालीसाठी शाळा व महाविद्यालयाचे कर्मचारी काम करीत आहेत.यासाठी संस्थेने प्रशासनासोबत सहकार्य करीत मदतीचा हातभार दिलेला आहे.
मास्क चा तुटवडा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे गरीब नागरिकांना सहज उपलब्ध व्हावे. यासाठी महाविद्यालयाने पुढाकार घेतलेला आहे. या प्रकल्पाला तहसीलदार डॉक्टर रवींद्र होळी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केलेले आहे. या उपक्रमात संस्थेचे कार्याध्यक्ष सुधाकर कुंदोजवार ,सचिव अविनाश जाधव, एडवोकेट मुरलीधर धोटे ,श्रीधरराव गोडे, दत्तात्रय येगीनवार, जसविंदर धोत्रा ,एडवोकेट संजय धोटे, दौलतराव भोंगळे, साजिद बियाबानी, प्राचार्य डॉक्टर संभाजी वारकड, उपप्राचार्य डॉक्टर राजेश खेरानी यांच्या मार्गदर्शनाखाली गृह अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापिका डॉक्टर.वनिता वंजारी प्राध्यापिका प्रीती सुभारे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अविनाश दोरखंडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी अथक परिश्रम घेत आहेत. प्रशासनाचे सर्व नियम पाळून ,सोशल डिस्टन्स राखून विद्यार्थी सामाजिक भावनेतून कठीण प्रसंगात हातभार लावण्यासाठी पुढे आलेले आहेत. यात बालाजी ताजने, पल्लवी वराठे ,अर्चना लेकलवार ,दीक्षिता वर्मा ,आनंद भटाळकर, सिमरन शेख, फिरोज अहमद, शुभम दिकुंडवार, दीपक राजूरकर, कला बोबडे, रोशनी टेकाम ,अंजली टेकाम, नेहा शेख विजया रागीट ,शिवाजी बल्की अर्थ फाउंडेशन चे डॉक्टर मोरे यांचे सहकार्य लाभले आहे.

 ...

संपूर्ण जग कोरोणामुळे ठप्प झालेले. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. या भागातील गरीब आदिवासी मजूर दूर वर्गांना आरोग्य मिळावे यासाठी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली 12 हजार मास्क बनवून मोफत वितरित करण्यात येत आहे .आतापर्यंत सहा ते सात हजार मास्क विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन तयार केलेली आहे. सामाजिक जाणिवेतून हे काम आम्ही करीत आहोत.

- प्राचार्य डॉक्टर संभाजी वारकड
शिवाजी महाविद्यालय राजुरा...


जगात महामारी चे संकट उभे आहे. या संकटातून बाहेर येण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावणे गरजेचे आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मामुलकर साहेब यांच्या प्रेरणेतून या भागातील गोरगरीब जनतेला सेवा देता येईल या हेतूने मोफत मास्क तयार करण्यात येत आहेत. आदिवासी ग्रामीण भागात मास्क वितरण करीत आहोत. शिवाय विद्यालयाच्या इमारतीमध्ये स्थलांतरित मजुरांना ठेवण्यात करण्यात आलेले आहे. त्यासाठीही प्रशासनाला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत. कठीण प्रसंगात देशासाठी प्रत्येकानी खारीचा वाटा उचलावा. हिच मानव धर्म आहे.
- अविनाश जाधव ,
सचिव , आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ. राजुरा