गडचिरोली जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून गरजूंना अन्नधान्याच्या किटस् चे वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० एप्रिल २०२०

गडचिरोली जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून गरजूंना अन्नधान्याच्या किटस् चे वाटपगङचिरोली/ प्रतिनिधी (रवींद्र कुडकावार )
कोरोणा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १४ एप्रिल पर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे अनेक लोकांच्या स्थलांतरणाचा प्रश्न निर्माण झालेला होता अशातच रोजगार उपलब्ध नसल्यामुळे अनेक कुटुंबाची उपासमार होत होती. सदर गडचिरोली जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या लक्षात येताच पदाधिकारी यांनी गडचिरोलीचे तहसिलदार मा. महेंद्र गणविर यांची भेट घेतली. त्यांनी गरजूंची यादी सादर करुन मदत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार आज दि. ९ एप्रिल ला तहसिल कार्यालय गडचिरोली येथे तहसिलदार मा. महेंद्र गणविर यांचे हस्ते ४० कुटुंबाना तांदुळ, दाळ, पीठ,कणिक, तेल,तिखट, मिठ, साबुण आशा जिवनावश्यक वस्तुचे वितरण करण्यात आले.

जिल्हा मुख्याध्यापक संघाने यापुर्वी सुद्धा गरजुंना भोजनदान करुन सामाजिक दायित्वाची जबाबदारी पार पाडली आहे, तसेच यापुढेही रूग्नांना फळवाटप करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे
*याप्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री संजय नार्लावार, सचिव श्री टी. के. बोरकर, कोषाध्यक्ष श्री संजय भांडारकर, सदस्य श्री मनिष शेटे उपस्थित होते. या मदत कार्यासाठी जिल्ह्यातील मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका तसेच माजी मुख्याध्यापक यांचे सहाकार्य लाभले आहे. संघाच्या या कार्याचे मा. शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी कौतुक केले आहे.*