आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करून वाढदिवस साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ एप्रिल २०२०

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करून वाढदिवस साजराराष्ट्रवादी काँग्रेसचेे युवा नेते मुनाज शेख यांचा आदर्श

भद्रावती(शिरीष उगे): सध्या राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले असून प्रतिकूल परिस्थितीत स्वतःच्या जिवाची परवा न करता प्रशासकीय सेवेतील  पोलीस, वैद्यकीय, पालिका व अन्य विभागातील अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या जीवाचे रान करीत आहे. या सर्वांना सलाम म्हणून येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख यांनी आपला वाढदिवस या सर्व अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचा  शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. 
      यावेळी दिवशी नगराध्यक्ष अनिल धानोरकर,  तहसीलदार महेश शितोळे ,नायब तहसिलदार मधुकर काळे, ठाणेदार सुनिलसिंग पवार व पोलीस निरिक्षक,पोलीस शिपाई ,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. नितीन सातभाई ,प्रर्यगाशाळा प्रमुख लांडे साहेब,याचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन मुनाज शेख यांच्यावतीने सत्कार करण्यात आला, कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अगदी प्रतिकूल परिस्थितीत या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे आभार मुनाज शेख यांनी मानल. यावेळी सबिया देवगडे, इजाज अली, रोशन कोमरेडीवार, निलेश जगताप, इरफान कुरेशी अफजल शेख आदींची उपस्थिती होती.