झोपडपट्टीमध्ये रोज जेवण व राशन वितरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ एप्रिल २०२०

झोपडपट्टीमध्ये रोज जेवण व राशन वितरण
महाराष्ट्रातील नागपूरमधील राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक राहुल मनोहर जीभकाटे यांनी सेवा करण्याच्या उद्देशातून कोरोना वायरस निर्मुलीकरण (लॉक डाऊन )झाल्यापासून गरीब गरजू लोकांना ,रस्त्यावर चालत असलेल्या गरीब मजुरांना, पोलीस कर्मचाऱ्यांना तसेचअपंग व्यक्तींना पुरी भाजी व पुलाव भात रोज सकाळ संध्याकाळ किमान दोनशे लोकांना देत असून स्वतःच्या वाहनांनी तो प्रवास करीत आहे .यशोधरा पोलीस स्टेशन कळमना ते पोलीस स्टेशन वनदेवी नगर ,झोपडपट्टी व एका जागेवरून दुसर्‍या जागेवर स्थलांतरण करणाऱ्या झोपडपट्टीमध्ये रोज जेवण व राशन वितरण करीत आहे .त्याच्या सोबत त्याच्या मित्रपरिवार अभिषेक धुर्वे, गौरव शाहू व अन्य सहकारी मदतीला धावत आहेत.