कलेक्टर व तहसीलदार येण्याची अफवा करून गर्दी जमवली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ एप्रिल २०२०

कलेक्टर व तहसीलदार येण्याची अफवा करून गर्दी जमवली१२५ जणांसह पत्रकारांवर गुन्हा दाखल


परभणी /प्रतिनिधी
पालम : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस निरीक्षक सुनील माने आणि त्यांच्या टीमने गावातील 125 व्यक्तीविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.

यासंदर्भात बोलताना पोलिस निरीक्षक सुनील माने म्हणाले. की पारवा गावात विविध अडचणी सोडविण्यासाठी गावातील काही मंडळींनी लाऊड स्पीकर द्वारे गावातील लोक जमा केले. वास्तविक कलेक्टरांचे जमावबंदी आदेश आहेत. सध्या या कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी गर्दी जमा होऊ नये असेही आदेश आहेत.परंतु पारवा गावातील लोकांनी याचे उल्लंघन केले. तसेच तहसीलदार आणि कलेक्टर येणार आहेत अशा अफवा पसरविल्या. त्याच प्रमाणे काही मिडीयाला देखील मुलाखती दिल्या. त्यामुळे पत्रकारावर देखील गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी दिली. या गावातल्या लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तहसीलदार आणि परभणीचे कलेक्टर येणार आहेत. अशा आशयाच्या अफवा उठवीत गावातील लाऊड स्पीकर द्वारे घोषणा करून जमावबंदी असताना गर्दी करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून गावातील 125 जणांसह पत्रकारांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आल्याची घटना घडलीय. पालम तहसील कार्यालयाचे मंडळ निरीक्षक कालिदास शिंदे यांनी यासंदर्भात पालम पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे या तक्रारी नुसार गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलिस निरक्षक सुनिल माने याच्या मार्गदर्शनाखाली फोजदार सचिन ईगेवाड तपास करत आहेत.