मदतीचे फोटो पोस्ट करणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ एप्रिल २०२०

मदतीचे फोटो पोस्ट करणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल






लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या काळामध्ये अन्नधान्य, फुड पाकीट , जेवण व अन्य मदत देत असल्याबाबतचे फोटो व व्हिडिओ काढून सोशल मिडीयामध्ये अनेकजण पोस्ट करीत आहेत. अशा प्रकारच्या पोस्ट करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी निर्बध घातले असून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मुदत आता ३मे पर्यंत वाढविण्यात आली आहे . लॉकडाऊनच्या काळात अनेक गरज नागरिकांना मदत म्हणून अन्नधान्य, जेवण , कीट , फुड पाकीट व अन्य साहित्याचे वितरण करण्यात आले . या मदतीचे अनेकांनी फोटो व व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणात पोस्ट केले गेले . मदत करणाऱ्यांचा उद्देश जरी चांगला असला तरी यामुळे गरजू व्यक्तींचा स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो हे लक्षात घेऊन कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत .