तेरा महिने फरार आरोपीस पकडले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ एप्रिल २०२०

तेरा महिने फरार आरोपीस पकडले

जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर तालुक्यातील वाटखळ येथे जमिनीच्या वादातून अपहरण ,खंडणी व दरोडा या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपी गेली १३ महिने फरार होता त्यास स्थानिक गुन्हेशाखेने शिताफीने पकडला.
याबाबतची हकिकत अशी की, वाटखळ येथे वाटखळ येथे ६ फेब्रुवारी २०१९ रोजी जमिनीच्या वादातून फिर्यादीस पांढऱ्या रंगाच्या वाहनातून नेऊन मारहाण केली होती .याप्रकरणी आरोपीच्या विरोधात ओतूर पोलिस स्टेशन मध्ये भादवि कलम३९५,३०७,३६४,३२३,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील आरोपी सचिन निवृती कुटे (वय३५)रा.नवलेवाडी पिँपरीपेंढार हा फरार होता. स्थानिक गुन्हे विभागास जुन्नर उपविभागात सरकारी वाहनातून कोरोना संचारबंदी पेट्रोलिग करीत असताना बातमीदारामार्फत सदर आरोपी हा त्याचे शेतातील घरी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार तात्काळ आरोपीच्या घरी जाऊन त्याचा शोध घेत असताना त्याला पोलीस आल्याचा सुगावा लागताच तो ओढ्यातून पलीकडे उडी मारून एक किलोमीटर लांब अंतरावरील पळून जाऊन ऊसाच्या शेतात लपला होता. एल. सी. बी. टीम ने त्याचा पाठलाग करून त्याला उसाच्या शेतातून शोधून, आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी ओतुर पो.स्टे. चे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रविंद्र मांजरे, पो हवा शंकर जम, पो.हवा. सुनिल जावळे, पो हवा शरद बांबळे पो.ना. दिपक साबळे, चा.पो.कॉ. अक्षय नवले यांनी केलेली आहे.