चिवङा खाऊन ते आठ तरुण करताहेत हैदराबाद ते छत्तीसगङ पायी प्रवास - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ एप्रिल २०२०

चिवङा खाऊन ते आठ तरुण करताहेत हैदराबाद ते छत्तीसगङ पायी प्रवास

जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पुढील कारवाई होणार

गौतम धोटे/आवारपूर
अख्या जगात कोव्हीड रोगाची लागण लागल्याने  शासनाने कोरोना विषाणूजन्य (कोव्हीड ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. त्यात सर्वत्र जिल्हा संचारबंदी असल्याने प्रवासी वाहतूक सेवा बंद आहे. त्यामुळे आठ तरुण करताहेत हैदराबाद ते छत्तीसगङ पायी प्रवास  करताना आदिलाबाद मार्गावर सापङले. हे तरुण पायदळ उपाशापोटी /चिवळ्यावर गाडेगावपर्यंत प्रवास केला. 

येथील जवळच असलेल्या सांगोडा फाटा येथील काहीच नागरिकांनी त्या पायदळी मुलाना चिवळा दिल्याची बातमी आहे. त्यानंतर गाडेगाव मार्गाने हे 8 मुले आलेत आणि येथील आवारपूर ग्रामपंचायत सदस्या शिलाताई गौतम धोटे यांच्या शेतातील पुलाजवळ असल्याने यानी गाडेगाव येथील सरपंच शारदा झाडे आणि पोलीस पाटील ठाकरे यांना ही माहिती दिली. आणि लगेच पोलीस पाटील आलेत. शिलाताई गौतम धोटे यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात माहिती दिली. जिल्हा बंदी असल्याने कोणतेही रस्त्यावर वाहने धावत नसल्याचे बघून ते मुले हेद्राबाद येथून छत्तीसगढ पर्यंत पायदळ निघाले.

वनसळी, नारंडा, वनोजाफाटा येथे  मिळेल त्या शेतशिवारात थांबत होते. ग्रामीण भागातील हिरापूर शेतशिवारात सायंकाळी दाखल झाले आणी येथील  ग्रामपंचायत सदस्य शिलाताई धोटे यांनी गाडेगाव येथील पोलीस पाटील यांच्या स्वाधीन केले.
 यामुलांना येथील नागरिक/ग्रामपंचायत सरपंच शारदा झाडे, पोलीस पाटील ठाकरे यांनी यांच्या नेतृत्वाखाली जेवनाची तरतूूद करण्याचे सांगितले.