कोरोना विषाणू आरोग्यविषयक भद्रावतीत घरोघरी कुटुंबाना सर्वेक्षण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ एप्रिल २०२०

कोरोना विषाणू आरोग्यविषयक भद्रावतीत घरोघरी कुटुंबाना सर्वेक्षण
भद्रावती/शिरीष उगे (दि.२६):
कोरोणा विषाणू प्रतिबंधकात्मक उपाययोजना म्हणून भद्रावती शहर व तालुक्यातील प्रत्येक घरोघरी जाऊन कुटुंबांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण दि. २५ ला करण्यात आले.
यावेळी सर्वेक्षण करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना मास्क तथा सॅनेटाझरचे वाटप करण्यात आले. घरो घरी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासाठी एकूण ३०० जणांचा सहभाग होता. प्रत्येकी दोन जन असणाऱ्या १५० पथकांचे गठन करण्यात आले. एका पथकाकडे शंभर घरांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली. संबंधित पथकांनी घरोघरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची आरोग्य विषयक माहिती घेतली. खोकला, सर्दी, ताप, श्वसनाचा त्रास याबाबत तसेच बाहेरून नव्याने येणाऱ्या सदस्यांबाबत विचारणा करण्यात आली. या एक दिवसीय अभियानात वैद्यकीय कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक, महसूल विभाग, इको प्रो चे सदस्य यांचा सहभाग होता. सकाळी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे नवीन आलेल्या आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी व इको प्रो च्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार महेश शितोळे, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. आनंद किन्नाके, डॉ. विपिन सातभाई, डॉ. कुंभारे, इको-प्रो चे संदीप जीवने यांचीउपस्थिती होती व उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच मास्क व सॅनेटाझर चे वाटप केले.