रेशन दुकानदाराकडून सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

रेशन दुकानदाराकडून सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी
▶️ ग्रापं.चे पदाधिकारीही उपस्थित/शासनाच्या नियमांना तिलांजली


गौतम धोटे /कोरपना
चंद्रपूर जिल्ह्यातील "कोरोना"च्या पार्श्वभूमी लक्षात घेता या जीवघेण्या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.केंद्र व राज्य सरकारकडून कडक असे निर्देश देण्यात आले असून कुणीही घराबाहेर पडू नये,अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्यास सदर दुकानात सोशल डिस्टंसिंग (सुरक्षित अंतर)चे पालन करण्यास सांगितले असतानाच मात्र कित्येक ठिकाणी दुकानदाराकडून शासन नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.सोशल डिस्टंसिंगची अक्षरशः ऐशीतैशी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.संबधित अधिकारी,कर्मचाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची ओरड सुरू असून इतर ठिकाणचे अपवाद वगळता तालुक्यात मोठ्याप्रमाणात शासनाच्या आदेशाला हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे.याच श्रेणीत कोरपना तालुक्यातील नांदाफाटा व नांदा येथील रेशन दुकानातून मागील दोन दिवसापासून PMGKAY योजनेतून अंतोदय व अन्नसुरक्षा शिधापत्रिका धारकांना प्रतिव्यक्ति 5 किलो प्रमाणे तांदळाचे वाटप केले जात आहे.मात्र धान्य वाटप करताना कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन होताना दिसत नाही.मुख्य म्हणजे यासंबंधीची सुचना सर्व दुकानदारांना दिल्या असतानाही याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसत आहे.आश्चर्याची बाब म्हणजे नांदा येथे ग्रामपंचायतीचा काही पदाधिकार्‍यांची सुद्धा उपस्थिती होती.त्या अनुशंगाने फोटोही सोशल मीडियावर वायरल झाल्याचे चित्र अाहे.त्यामुळे एका जबाबदार पदांवर विराजमान लोकप्रतिनिधीच जर शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करत नसेल तर सामान्य नागरिक काय बोध घेणार याविषयी चिंता व्यक्त होत आहे.अनेक ठिकाणी रेशन दुकानदारांनी व्यवस्थित नियोजन करून धान्य विकण्याच्या ठिकाणी एक,एक मिटरच्या अंतरावर सिमांकन करून सोशल डिस्टंसिंग ठेवून धान्य वितरण केले आहे.मात्र नांदा व नांदाफाटा येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आणी सांगोळा आदी गावात मोठ्या प्रमाणात गदीँ येथील मोठी गदीँ याला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण होत आहे.सोशल डिस्टंसिंगचा विसर पडलेल्या रेशन दुकानदारला तहसीलदारांनी वेळीच समज देणे तसेच स्थानिक पोलिस पाटील,सरपंचांनी सुद्धा सोशल डिस्टंसिंग ठेवून धान्य वितरणाची व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करणे काळाची गरज बनली आहे.