२० एप्रिलपासून सुरु होताहेत 'या' गोष्टी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ एप्रिल २०२०

२० एप्रिलपासून सुरु होताहेत 'या' गोष्टीमुंबई - २० एप्रिल नंतर देशातील कोरोना ग्रीन झोनमधील अनेक गोष्टी सशर्त सुरु होणार आहेत. याबाबत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी दिली होती. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून एक नोटिफिकेशन देखील काढण्यात आलं होतं. अशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याने महाराष्ट्रात त्यापैकी किती गोष्टी सुरु होणार याबद्दल साशंकता होती. दरम्यान आता महाराष्ट्र सरकारने एक नोटिफिकेशन जारी केलंय. यामध्ये महाराष्ट्रात २० एप्रिल नंतर काय काय सुरु होणार याबाबत माहिती देण्यात आली आहे.

20 एप्रिलनंतर राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन तसेच अटी व शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायिक उपक्रमांना सुरू करण्यात येणार आहे.


२० एप्रिलनंतरही हे बंदच राहणार

 • सिनेमागृहं आणि मॉल्स, जिम, स्विमिंग पूल्स , थिएटर्स , स्पोर्ट्स सेंटर्स
 • आदरातिथ्य म्हणजेच हॉस्पिटॅलिटी सेवा, बार्स
 • सामाजिक, धार्मिक , राजकीय, क्रीडा कार्यक्रम
 • जिल्ह्यांतर्गत आणि राज्यांतर्गत प्रवासी रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक
 • रिक्षा किंवा टॅक्सी सर्व्हिस
 • शाळा, महाविद्यालयं आणि सर्व शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस

२० एप्रिलपासून 'या' गोष्टी सुरु आहे सशर्त परवानगी

 • जीवनावश्यक वस्तूंची दुकानं
 • जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक करणारे ट्रक, ट्रक्सचे गॅरेजेस
 • शेतीसंबंधीची सर्व कामं, खत आणि कीटकनाशकांची विक्री करणारी दुकानं, मत्स्य व्यवसाय, सिचन प्रकल्प, मनरेगाची कामं
 • डिजिटल व्यवहार
 • आयटी सेवा आणि कॉल सेंटर्स ( ५० टक्के कर्मचारी )
 • कुरिअर सेवा
 • ऑनलाईन शिक्षण
 • सरकारी कार्यालयं
 • आरोग्य सेवा
 • लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था करणारे हॉटेल्स , मोटेल्स अंडी क्वारंटाईन सेंटर्स
 • इलेक्ट्रिशियन, प्लम्बर्स, मोटार मेकॅनिक्स, IT सुविधा देणारे कर्मचारी