शुभस्वप्न समूहातर्फे पौरोहित्यांना किराणा वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ एप्रिल २०२०

शुभस्वप्न समूहातर्फे पौरोहित्यांना किराणा वाटप
औरंगाबाद/ प्रतिनिधी
येथील शुभस्वप्न समूहातर्फे रविवारी 11 गरजू पोरोहित्यांना किराणा वाटप करण्यात आला आहे.
कोरोना ची स्थिती बघता पोरोहित्यांचे काम व्यवसाय पूर्ण पणे बंद आहे. आणि जमावबंदी मुळे पुढे सुद्धा बंद राहण्याची शक्यता आहे . असे असल्या करणारे गरीब आणि गरजू ब्राह्मण पौरोहित्यांना शुभस्वप्न समूहातर्फे एका महिन्याचा किराणा वाटप करण्यात आला होता. हा किराणा शुभस्वप्न समूहाच्या ऑफिस मधून सामाजिक अंतर पाळून देण्यात आला आहे. एकूण 100 कुटुंबियांना अन्न आणि धान्याची मदत करण्याचा संकल्प शुभस्वप्न समूहाच्या सदस्य आणि पदाधिकारी यांनी केला आहे.
एका कुटुंबा साठी एक किट आम्ही वाटप करत आहोत एका किट मध्ये साधारण महिनाभर पुरतील अशे 13 किराणा वस्तू आम्ही देत आहोत असे सांगण्यात आले आहे. आमचा संकल्प लवकरच पूर्ण करू असे शुभस्वप्न समूहाच्या पदाधिकारिंनी सांगितले.