गस्तीवरील दोन पोलिसांना अभियंत्याने केली बॅटने मारहाण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ एप्रिल २०२०

गस्तीवरील दोन पोलिसांना अभियंत्याने केली बॅटने मारहाण


गडचांदूर - रविवार, दि. 19 एप्रिल दुपारी 12 वाजताच्या दरम्यान गडचांदूर पोलीस कॉन्स्टेबल तिरुपती माने व रोहित चिडगिरे शहरात गस्तीवर असताना सरण सॉ मिल समोरील ग्राउंडवर काही युवक क्रिकेट खेळताना आढळले. पोलिसांनी यांना संचारबंदी असून क्रिकेट खेळण्यास मनाई करत घरी जाण्यास सांगितले असता खेळत असलेला एका इंजिनिअरने पोलिसांशी वाद घालून मारहाण केली.
चव्हाण याने धक्काबुक्की करत कॉन्स्टेबल तिरुपती माने यांच्या डोक्यावर बॅटने हमला केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्याचवेळी कॉन्स्टेबल रोहित चिडगिरे यांच्यावर क्रिकेट स्टम्पने हल्ला करून जखमी केल्याची माहिती आहे.

गंभीर जखमी तिरुपती माने यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे दाखल केले. त्यानंतर त्यांना तात्काळ चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले व रोहित चिडगिरे यांना सुद्धा प्रथमोपचार करून चंद्रपूरला हलविण्यात आले.

या प्रकरणातील मारहाण करणारा मुख्य आरोपी राजुरा येथे जलसंधारण या शासकीय विभागात जुनिअर इंजिनिअर पदी कार्यरत असून व इतर सहा आरोपींना ताब्यात घेतले. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोपाल भारती अधिक तपास करीत आहेत.