स्वच्छता व घंटागाडी कर्मी यांचा इको-प्रो व नागरिकांकडून सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ एप्रिल २०२०

स्वच्छता व घंटागाडी कर्मी यांचा इको-प्रो व नागरिकांकडून सत्कार
भद्रावती/शिरीष उगे (दि.१९) :
भद्रावती नगर परिषद सफाई कर्मचाऱ्याची कोरोना च्या सावटात सुद्धा नियमितता कायम असून एकीकडे जिथे आपण "घरिच रहा-सुरक्षित रहा, सतत हाथ धुवा आणि मास्क चा वापर करा" या त्रिसूत्री चा पालन करतोय.
तेव्हा मात्र ही मंडळी शहरभर-घरोघरी फिरून आपण केलेला कचरा-घाण जमा करून स्वच्छ करित असतात. कोरोना आपदा दरम्यान जशी 'स्व-स्वच्छता' आवश्यक आहे तशी 'परिसर स्वच्छता' सुद्धा आवश्यक आहे. ही परिसर स्वच्छता महानगरपालिका व नगरपालिका च्या माध्यमाने सफाई कर्मचारी खंड पडू न देता करित आहेत.
त्यांचा सन्मान, त्यांचे आभार आणि यावेळी थोड़ी मदत करता यावी, म्हणून या उपक्रमाची इको-प्रो आणि परिसरातील नागरिकाकडून सुरुवात करण्यात आली, शहरात ठीक ठिकाणी नागरिकांनी या पद्धतीने सफाई कर्मचारी यांना प्रोत्साहित करन्याची गरज आहे.
आपल्या घर-परिसरात येणारे घंटागाडी सफाई कर्मचारी यांचे आभार मानावे तितके कमी आहे, त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी, थोड़ी मदत सुद्धा (किराणा साहित्य) म्हणून परिसरातील नागरिक व इको-प्रो मिळून असा एक प्रयत्न करण्यात आला...
भद्रावती येथील एकता नगर किल्ला वार्ड परिसरातील नागरिकांनी आज घंटागाडी च्या कर्मचारी चे गल्लीत टाळया वाजवून, फूल टाकून त्यांचे आभार मानत स्वागत केले, तसेच इको-प्रो भद्रावती तर्फे शहरातील सर्वच भागात कोरोना दरम्यान आवश्यक सेवा मधे दिवस रात्र काम करणारे कर्मचारी यांचे आभार व्यक्त करित प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे.
याकरिता इको-प्रोचे अध्यक्ष संदीप जीवने, किशोर खंडाळकर, अमोल दौलतकर, संतोष रामटेके , देवानंद श्रीरामे ओमदास चांदेकर, संदीप वालदे ,गौरव घोटेकर, अथर्व भाके,शुभम मेश्राम, शिवानी गौरकर , हनुमान घोटेकर ,जय दारुडे, दीपक कावठे, निलेश ठाकरे ,वैभव पाटील, सूचित कुडवे, मृगमय पाटील, उपेंद्र वैद्य व नागरिक यांनी सहकार्य केले.