बाहेरून येणाऱ्या नागरिकांची आधी तपासणी; मगच गावात एन्ट्री - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ एप्रिल २०२०

बाहेरून येणाऱ्या नागरिकांची आधी तपासणी; मगच गावात एन्ट्री
घरात घेऊ नये, दवाखान्यात तपासणीसाठी जावे - सरपंच अनिरुद्ध शहारे

गावात सॅनिटाझर फवारणी चा दुसरा टप्पा
संजीव बडोले/नवेगावबांध
नवेगावबांध:- ग्रामपंचायतच्या वतीने दि-१५-०४-२०२० पासुन कोरोना विषाणु पासुन बचाव करण्यासाठी, ग्रामपंचायत कार्य क्षेत्रात जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायत मध्ये झालेल्या बैठकीत सरपंच श्री-अनिरूद्ध शहारे,उपसरपंच रघुनाथजी लांजेवार, ग्रामविकास अधिकारी-पी.आर.चव्हान ग्रामपंचायत सदस्य रेशीम काशिवार,शितल राऊत,गुनवंताबाई डोंगरवार, लताबाई आगासे,अर्चना पंधरे,अनुशया नैताम उपस्थित होते. गावातील सार्वजनिक ठिकाणी सुध्दा फवारणी होणार असून,आप-आपल्या परिसरातील सन्मानिय ग्रामपंचायत सदस्यांनी फवारणी करून घ्यावे. फवारणीचा हा दुसरा टप्पा आहे. सध्या लॉकडाऊन असुन ग्रामवाशीयांनी लॉकडाऊनचे तंतो-तंत पालन करावे, अत्त्याआवश्यक कामासाठी घरा बाहेर निघतांना मास,गमछा चा वापर करावा, बाहेरुन गावात येणाऱ्या लोकांनी घरी न जाता सरकारी दवाखान्यात आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी, विलगी करणाकरीता ज्यांच्याकडे वेगळी रुम नाही ,अशा लोकांकरीता जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 बसस्थानक जवळ येथे १४दिवस राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेर गावुन येणाऱ्या कुठल्याही व्यक्तिला एकदम घरात घेवु नये. त्या बाबद ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलिस ठाणे, तलाठी यांच्याकडे त्वरीत सुचना द्यावी. दुपारी दोन च्या नंतर सुध्दा लोकांचे जाने-येणे रत्यावर पहावयास मिळत आहे, हि गंभीर बाब आहे. अत्यावश्यक कामाशिवाय
लोकांनी घरा बाहेर पडु नये, कुणीही गावात कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव वाढेल, असे कृत्य करु नये. पोलिस विभागाला सहकार्य करावे. भारताचे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जनधन बँक खात्यावर रू पाचशे टाकण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. सरकारी स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय व केशरी कार्ड धारकांना प्रती व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे. तीन महिन्यां करीता ऊज्वला गँस मोफत उपलब्ध करून दिले आहे. संबंधित एजेंसी कडे जावून ऊज्वला लाभार्थानी आपले गँस मोफत घ्यावे. अशी विनंती ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.