संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेनी दिले मुख्यमंत्री कोविड सहायता निधीस 1लक्ष 11हजार एकशे अकरा रुपयांची सहायता - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ एप्रिल २०२०

संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेनी दिले मुख्यमंत्री कोविड सहायता निधीस 1लक्ष 11हजार एकशे अकरा रुपयांची सहायता

नागपूर : अरूण कराळे 
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूशी  शासन लढा देत आहे त्यास सहकार्य म्हणून नागपूर जिल्हयातील हिंगणा येथील संत गमाजी महाराज शिक्षण संस्थे द्वारे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहायता  कोविड 19 ला एक लक्ष अकरा हजार एकशे अकरा  रुपयाचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री रमेशचंद्र बंग व संचालक महेश बंग यांच्या हस्ते नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे  यांना देण्यात आला.