नियम तोडणाऱ्यांना बेशरमाचे वृक्ष देऊन स्वागत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ एप्रिल २०२०

नियम तोडणाऱ्यांना बेशरमाचे वृक्ष देऊन स्वागतभद्रावती पोलिसांचा अनोखा उपक्रम
भद्रावती (शिरीष उगे): जगा सह देशात राज्यात कोरोना वायरस मोठ्या झपाट्याने प्रसार होत असल्याने तालुक्यात संचारबंदी च्या काळात नागरिकांना वारंवार सूचना करून सुद्धा विनाकारण मोटारसायकलने रस्त्यावर उतरणाऱ्याना भद्रावती पोलिसांनी त्यांच्या कपाळावर टीका लावून आरती ओवाळली व त्यांच्या हाती बेशरमाचे वृक्ष देऊन आम्ही कधी सुधारणार नाही असे म्हणत बेशरमा सारखे वृक्ष घरी लावा असा अनोखा उपक्रम भद्रावती पोलिसांनी हाती घेतला

जिल्हयात कोरोना चा एकही रुग्ण आढळला नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन सज्ज असताना संचारबंदी च्या काळा संपूर्ण शहर बंद असताना विनाकारण बाहेर निघणाऱ्यांवर वेगवेगळे प्रयोग अनुभवले परंतु त्यांच्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम दिसून येत नसल्याने ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात सपोनि सुधीर वर्मा, पोऊनी जितेंद्र ठाकूर ,वाहतूक नियंत्रक तनोज टेकाम, शंकर पप्पू लवार ,राजेश वराडे ,भीमराव पडोळे .सुषमा पवार, संजय मालेकर अच्युत नांदेकर यांनी वेग वेगळ्या चौकात दुचाकी चालकांना बेशरमाचे वृक्ष हातात दिले त्यांची आरती ओवाढून ते वृक्ष घरी लावून मी कदापि सुधारणार नाही या वृक्ष प्रमाणेच बेशरम राहील असे स्वागत करणाऱ्या 25 दुचाकी चालकावर कारवाई करण्यात आली.