छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना मोफत भोजन उपक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ एप्रिल २०२०

छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना मोफत भोजन उपक्रम
परभणी/प्रतिनिधी -गोविंद मठपती
कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून सध्या सर्वत्र संचारबंदी सुरू आहे .या काळात परभणी येथील छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान च्या वतीने शहरातील गरजूंना मोफत अन्नदान करण्यात येत आहे. दिनांक 28 मार्च पासून हा उपक्रम सुरू असून दररोज तीनशे लोकांना मोफत अन्नाची पाकिटे वितरित करण्यात येत आहेत. यासाठी परभणी शहरातील धाररोड येथे स्वतःच्या प्लॉटमध्ये जेवण तयार करण्यासाठी शेड तयार करण्यात आले असून दहा महिलांना भोजन तयार करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. संचार बंदीच्या काळात शहरातील निराधार नागरिक , मोल मजुरी करणारे तसेच सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे नातेवाईक अशा 300 गरजूंना मोफत अन्नाची पाकिटे वितरीत करण्यात येत आहेत .संस्थेचे अध्यक्ष किशोर रणेर ,अमोल गिरवलकर ,रवी घायाळ, श्रावण वैरागड, संतोष वर्मा आदी पदाधिकारी यासाठी परिश्रम घेत आहेत. आमदार डॉक्टर राहुल पाटील ,पोलिस उपअधीक्षक नितीन बगाटे,आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले असल्याचे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष किशोर रणेर यांनी सांगितले