चंद्रपुर:CM फंडमध्य आतापर्यंत 62 लक्ष रुपयाचा निधी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ एप्रिल २०२०

चंद्रपुर:CM फंडमध्य आतापर्यंत 62 लक्ष रुपयाचा निधी

CMs Relief Fund & Fortis Foundation supports treatment of children ...
चंद्रपूर/प्रतींनिधी:
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून जिल्हा सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थांनी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले होते. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसांपासून या निधीकडे आर्थिक मदत जमा करण्याचा ओघ सुरू झाला आहे. आज नानाजी बोंढाले वरोरा यांच्याकडून रु.20 हजाराचा धनादेश प्रधानमंत्री सहायता निधीस देण्यात आला.

आज प्रामुख्याने अथर्व कॉलनी विकास समिती चंद्रपूरच्या वतीने रु.11 हजार तर सदाशिव पचारे चंद्रपूर यांच्याकडून रु.25 हजाराचा धनादेश जिल्हा सहायता निधीस देण्यात आला.

त्या सोबतच मुख्यमंत्री सहायता निधी कोविंड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये एसीसी चांदा सिमेंट वर्क एम्प्लॉईज युनियन च्या वतीने रु.10 लक्ष 2 हजार तर प्रेसिडेंट मराठा सिमेंट वर्क कामगार संघटना यांच्यावतीने रु.8 लक्ष 39 हजार 773, चंद्रपूर जिल्हा सहकारी स्वस्त धान्य दुकानदार संघ चंद्रपूर यांच्याकडून रु.40 हजार, तर अतुल एचपी गॅस पोंभुर्णा यांचेकडून रु.10 हजाराचा धनादेश देण्यात आला.

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे. तिसऱ्या वर्गातील तनिष्का शर्माने आपली पिगी बँक देवून कोरोना विरुध्दच्या लढ्यासाठी जिल्हा सहाय्यतेला मदत केली आहे.


आज प्रामुख्याने जुबली फाउंडेशन चंद्रपूर (1994 बॅच) जुबली फाउंडेशनचे अध्यक्ष कात्यायन शेंडे,सचिव संतोष तेलंग तसेच सदस्य रेवती बठकेलवार,आरती श्रावणे यांच्या हस्ते  रु.21 हजार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्युत कर्मचारी सह. पतसंस्था ऊर्जानगरच्या वतीने रु.20 हजारजिल्हा परिषद शिक्षण कर्मचारी सह.पतसंस्था गडचांदूरजय भारत मजूर सह.संस्था विसापूरप्रतिकार नागरी सह. पतसंस्था जुनासुर्लासेवा सहकारी संस्था चार्ली,ममता नागरी सह. पतसंस्था चंद्रपूरच्या वतीने  प्रत्येकी रु.11 हजारअजय मेकलवार चंद्रपुर यांच्याकडून रु.31 हजारचंद्रपूर नागरी सह. पतसंस्था चंद्रपूरच्या वतीने रु.15 हजार  तर सौरभ ट्रेडर्स चंद्रपूर यांचेकडून रु.21 हजाराचा धनादेश जिल्हा सहायता निधीस देण्यात आला.

त्यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधी कोविंड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग रिसर्च टेक्नॉलॉजी चंद्रपूरच्या वतीने रु.1 लक्ष50 हजार सहायता निधी देण्यात आला.

कोरोना: मदत करायचीय ? 'या' बँक खात्यात पैसे जमा करा !
कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक 960310210000048 असून यासाठी आयएफएससी कोड BKIDOOO9603 असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.