कोरोनाशी लढण्यासाठी गोल्ला ऊर्फ गोंलकर समाज संघटना,यांचे कडून मदत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ एप्रिल २०२०

कोरोनाशी लढण्यासाठी गोल्ला ऊर्फ गोंलकर समाज संघटना,यांचे कडून मदत

चंद्रपुर/प्रतींनिधी:
कोविड-19,कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी तसेच आजार रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणुन गोल्ला ऊर्फ गोंलकर समाज संघटना, जिल्हा चंद्रपूर यांचे वतीने रू. 31,000/- (अक्षरी रूपये एकतिस हजार) च्या निधीचा धनादेश जिल्हाधिकारी सहाय्यता निधीमध्ये मदतनिधी म्हणुन मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना आज सुपूर्द करण्यात आला. 

सदर धनादेश गोल्ला ऊर्फ गोंलकर समाज संघटना, जिल्हा चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष श्री. अजय मेकलवार यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी सचिव श्री. महेश मॅकलवार, संघटक श्री. प्रविण भिमणवार, महेश अंगडलवार तसेच मार्गदर्शक श्री. रतनजी शिलावार, श्री. गणपतजी बुर्रीवार व मनोहरजी कोपुलवार उपस्थित होते.