C.C.I च्या खरेदी केंद्राला माजी मंत्री हंसराज अहीर यांची भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ एप्रिल २०२०

C.C.I च्या खरेदी केंद्राला माजी मंत्री हंसराज अहीर यांची भेट

चंद्रपूर/प्रतिनिधी:
सि.सि.आय ची कापुस खरेदी चंद्रपूर व यवतमाळ जिल्हाभर व मोठ्या प्रमाणात व्हायला पाहीजे ती अजुन झालेली नाही हजारो शेतकऱ्यांची नोंदनी चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात झालेली आहे. राजुरा तालुक्यात आठ हजार च्या वर व कोरपाना तालुक्यात साडेसात हजाराच्या वर शेतकऱ्यांची नोंदनी झालेली आहे. 

खरेदीच्या गाड्यांची संख्या वाढ करणे तसेच खरेदीचा वेळ स. 06.00 ते सायं. 06.00 पर्यंत वाढविने अशा सुचना अहीर यांनी केल्या. सर्व जिनींग मालकांचे ऍग्रीमेंट करून कापुस खरेदी करण्याकरीता बाध्य करावे लागेल. वर्षाणुवर्ष जे शेतकरी ज्या जिनवर माल विकतो त्या जिन मालकांनी अशा संकटाच्या वेळेस शेतकऱ्यांचा कापुस घेण्यास टाळाटाळ करू नये. कोरोना लाॅकडाऊन मुळे शेतकऱ्यांनी घरात खोल्यांमध्ये कापुस भरल्यामुळे त्यांचा विचार झाला पाहीजे. समोर शेतीचा हंगाम आहे 

अशा स्थितीत शासनाचे नियम पाळुन सर्व जिनींग मालकांनी नफ्याकडे लक्ष न देता शेतकऱ्यांशी तुमचे असलेले जुने संबंध पाहुन ही खरेदी केलीच पाहीजे टाळु नये ही विनंती करूण एपीएमसी च्या माध्यमातुन होणारी खरेदी व सि.सि.आय ची खरेदी दोन्ही खरेदी सर्वत्र सुरू झाली पाहीजे अशा सुचना अहीर यांनी केल्या.

 आता पुन्हा उर्वरीत शेतकऱ्यांची नोंदनी शिल्लक असल्याने नोंदनी सतत सुरू ठेवावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करूण चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील कापुस उत्पादकांचे हाल बेहाल होणार नाही याची काळजी घ्यावी. सिएमडी सि.सि.आय या स्वतः विदर्भात दौरा करूण गेल्या आणि खरेदीची त्यांची तयारी अयतांना हजारों शेतकऱ्यांची नोंदनी झाली असल्याने चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व जिन मालकांनी पुढाकार घेणे जरूरी आहे, टाळु नये अशी विनंती केली.