कुशन दुकानाला लागलेल्या आगीत पाच लाखाचा माल जळून राख - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ एप्रिल २०२०

कुशन दुकानाला लागलेल्या आगीत पाच लाखाचा माल जळून राख
मूल- येथील बसस्थानक नजीक असलेल्या पेट्रोल पंप शेजारील कुशन दुकानाला लागलेल्या आगीत दुकानातील सर्वच माल जळुन राख झाली. ही घटना आज ता.14 ला दुपारी 1 वाजता दरम्यान घडली. शहरात असलेल्या संचारबंदी मुळे सदर कुशनची दुकान 22 मार्च पासुन बंद आहे. त्यामुळे दुकान मालकाचे दुकानाकडे येनेच नाही. आज दुपारी 1 वाजता दरम्यान कुशन दुकाना शेजारील पेट्रोल पंप चालकाला कुशन दुकानातून धूर निघत असल्याचे दिसून आले. त्यांनी प्रसंगावधान राखत पोलिसानां माहिती दिली. पोलिसानी लगेच घटना स्थळ गाठूण दुकानाचे दरवाजे तोडुन नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचा मदतीने दुकानाला लागलेली आग विझविली. या बाबतची माहिती दुकान मालक सादीक अली बापु मियाँ सय्यद यानजेयांना देण्यात आली. दुकान मालक दुपारचे जेवण करुन आपल्या घरी झोपले असतां पोलिसांचा त्यानां फोन गेला. त्यांनी दुकानाकडे धाव घेतली. आगीत दुकानातील सर्वच माल जळुन राख झाले. संचारबंदीचा पंधरा दिवस आगोदर दुकानात पाच लाखांचा माल भरला होता. आगीत तो सगळा जळाल्याचे दुकान मालकाने सांगितले.