७६ रक्तदात्यानी केले रक्तदान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ एप्रिल २०२०

७६ रक्तदात्यानी केले रक्तदान

महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ सावली तर्फे रक्तदान शिबीर
निफन्द्रा (प्रतिनिधी)
देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंध उपाय म्हणून अनेक योजना राबवित आहे. महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती चे औचित्य साधून सामजिक बांधिलकी जपत सावली तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 76 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
ग्रामीण पत्रकार संघा च्या वतीने अनेक सामजिक उपक्रम राबवून सामान्य माणसा पर्यंत सेवा देण्याचे कार्य सुरू आहे. एक हात सहकार्याचा' या उपक्रमाद्वारे मास्क वाटप,नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर,रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम राबवित आहेत.
सध्या ची कोरोना परिस्थिती लक्षात घेता ग्रामीण पत्रकार संघ सावली तर्फे सावली येथील कृषी उत्पन्न समिति बाजार येथे दि.१६ एप्रिल रोज गुरुवारला रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
कोवीड- १९ प्रतीबंध करण्यासाठी जागतीक स्थरापासुन त खेड्यातील खेड्याततल्या व्यक्तींला यापासून सुरक्षीत करण्यासाठी केद्र व राज्य सरकार सर्वस्थरावरुन प्रयत्न करीत आहे. कोरोना संसर्ग प्रतीबंधा करीता राज्यातील आरोग्य, महसुल पोलीस. विभागाबरोबर अनेक कर्मचारी जिवाची पर्व न करता एक विश्वयुद्ध योद्धया प्रमाणे लढत आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागानेकेलेल्या आव्हानानुसार
राज्यात भविष्यात उद्भवना-या आपातकालीन परिस्थीतीत ब्लड बँंकेत आवश्यक रक्त पुरवठा लक्षात घेता दि. १६ एप्रिल रोजी सावली येथील क्रुषि उत्पन्न बाजार समिती येथे महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यानिमीत्ताने 76 रक्तदाते या राष्ट्रीय कार्यात सहभागी हेवुन सहकार्य केले.
या उपक्रमात पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल स्वामी, उपाध्यक्ष सतीश बोमावार, सचिव लखन मेश्राम, प्रसिध्दी प्रमुख आशिष दुधे, अनिल गुरनुले, प्रवीण गेडाम, दिलीप फुलबांधे, शितल पवार, राकेश गोलेपल्लीवार, सुधाकर दुधे, विजय कोरेवार, आशिष पुण्यपकार खोजिद्र येलमुले, देवा बावणे आदी सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.