वाडी पोलीसांनी केली १० लिटर मोहफूलाची - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ एप्रिल २०२०

वाडी पोलीसांनी केली १० लिटर मोहफूलाची

दवलामेटीत सापडली दारू
नागपूर : अरूण कराळे 
तालुक्यातील वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या दवलामेटी येथील समाज भवन जवळ वाडी पोलीसांनी  धाड टाकून १० लिटर मोहफूलाची दारू जप्त करण्यात आली .
 प्राप्त माहितीनुसार बुधवार १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या  दरम्यान वाडी पोलिसांनी प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे दवलामेटी येथील  वार्ड क्रमांक ५ येथील समाजभवन जवळ धाड टाकली असता १० लिटर अंदाजे १२५० रुपये किमतीची मोहफूलाची दारू  जप्त करण्यात आली . 
आरोपी दिपक उर्फ विठ्ठल रवी आठनकर, वय २३ वर्ष  राहणार दवलामेटी  असून हा आपल्या घराच्या परिसरातच दारू विक्रीचा व्यवसाय करीत होता. गोंडखैरी ता . कळमेश्वर ,जि . नागपूर येथून मोह फुलाची दारू आणून परीसरात विक्री करीत होता . आरोपीविरुद्ध कलम ६५, (ई) महाराष्ट्र दारू कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात डीबी एचसी सुनिल डगवाल,विजय पेंदाम,धनराज भोले,डब्लूपीसी ज्योती माकोडे यांनी  कारवाई केली.वाडी पोलीसांनी केली १० लिटर मोहफूलाची वाडी पोलीसांनी केली १० लिटर मोहफूलाची wadi-police-mohfuldaru